Friday, October 20, 2017

६६ व्या वर्षात पदार्पण करीत असताना

सा. कल्याण नागरिकच्या प्रकाशनाला ६५ वर्षे पूर्ण होऊन आता ६६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.  हे केवळ शक्य झाले आहे ते वाचकांच्या निस्सीम प्रेमापोटी.  व्यक्तीने वार्धक्यात प्रवेश केल्यानंतर शरीराचे वेगवेगळे अंग हळूहळू निष्क्रीय होण्यास सुरूवात होत असते.  सा. कल्याण नागरिक मात्र दिवसेंदिवस तरूणपणाकडे वाटचाल करीत असताना दिसत आहे.  वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे सा. कल्याण नागरिकच्या सभासदांची संख्या दर आठवड्याला वाढत चालली आहे.  

वाढत्या वाचकांच्या संख्येमुळे आपोआपोच जाहिरातींची संख्या पण चांगली वाढली आहे.  त्यातून दर महिन्याला एक रंगीत विशेषांक प्रसिद्ध करण्याची कल्पना अंमलात आणली गेली.  रंगीत विशेषांकाबरोबरच प्रत्येक विशेषांक हा विशिष्ट विषयाशी निगडीत असावा असा प्रयत्न झाला व त्याला खूपच चांगला प्रतिसाद वाचकांनी दिला आहे.  अशा विशेषांकाद्वारे आपल्या शहरात एक चांगली चर्चा घडवून आणावी व अभिजनांकडून सर्वसामान्य वाचकांचे प्रबोधन व्हावे अशी अपेक्षा या विशेषांकामागची आहे. 

पुढे वाचा...